१८ मार्च १९७४ पासूनचा हा प्रवास एका ध्येय्य्ने..एकच उद्देशाने..ह्या पुण्यात आपल्याला रहायचेय..जिद्द कायम ठेवत ही वाटचाल सुरू केली...अविरत..अनेक अनुभव साठवत अनेकांचे पुत्रवत..मित्रवत प्रेम मिळवत ...
साठलेल्या मनाच्या कप्प्वात अनेक गोष्टी असतात. त्या मनमोकळे लिहणे हा उद्देश..
सुभाष इनामदार, सातारा (सध्या मुक्काम पुणे)
inamdar.subhash1@gmail.com
9552596276
मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या 'ठाण्या'त.
इथल्या मंडईचे देखील विद्यापिठ आहे.
आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे.
बोलणे आ इथला धर्म आहे
आणि ऎकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि स्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्रा जागा नाही.
कवीता फाडण्याच्या मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याच्या
दुसरे दिवशी वाण्याच्या
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!
पु.लं.
साठलेल्या मनाच्या कप्प्वात अनेक गोष्टी असतात. त्या मनमोकळे लिहणे हा उद्देश..
ReplyDelete