My Blog List

Tuesday, July 24, 2012

पुण्याची ती हवा निघून गेली..

एके काळी पुण्याची हवा देशभरात सर्वात छान म्हणून वास्तव्याची पहिली पसंद लोक पुण्याची निवड करीत..आज ते पुणं उरले नाही...ती हवा निघून गेली...



आता फक्त दुकाचींचे.. तेही सायकल नव्हे बरका..तर मोटारसायकली... शहर म्हणून सर्वाधिक ट्रॉफिक ... चौकाचौकात विहतूक नियंत्रक असणारे आणि त्याचा रंग हिरवा केव्हा होतो आहे ते पाहून वाट पहाणारे...पुणेकर मंडळी..अर्थात ती पुण्यात राहतात ...कोणत्याही निमित्ताने म्हणून...अन्यथा खरा सदाशिव पेठी, नारायण, शनिवार आणि अप्पा बळवंत चौकातला मूळ पुणेकर केव्हाच सिंहगड रस्ता किंवा सहकार नगर , बिबवेवाडी सारख्या उपनगर नामक वसाहतीत गाशा गुंडाळून गेलाय... सोबत घेऊन गेलाय पैशाचे पुडके...तेही व्यावसायिकाला वाडे बांधयला देऊन..

त्यामुळे झालेय काय ...आजुबाजूबाजूची गजबज अधिक वाढली आहे...प्रत्येकाकडे स्वयंचलित वाहने आलेच...कार पुण्याच्या परिवहन सेवेची वैशिष्ट्ये तुम्ही वेळोवेळी वाचतच असाल...गाड्यांचा दर्जा..त्यांची सेवेची गुणवत्ता आणि वाढत्या लोकसंख्येला अपुरे पडणारी वाहनांची उणीपुरी संख्या....

मग काय तो पुणेकर सायकल थोडाच दामटतो...उलट एकादा सायकलवाला दिसला तर पादचा-यासारखा जीव मुठीत घेऊन चालविताना दिसेल..



अर्थात एक नक्की...पुण्याचे पाणी जे अद्यापी आटलेले नाही...कारण चारी बाजूला उभी असलेली धरणे... पण सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण वाढले आणि वाहतुकीसाठी, सिंमेटचे रस्ते करण्यासाठी आणि बांधकामासाठी सारी ती वृक्षराजी केव्हाच नष्ट झाली...त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. नव्या वृक्षांची लागवड खुरटली आणि ठिकठिकाणी फुटपाथच्या भोवती...एका बंदिस्त पिंज-यात जगावे यासाठी एखाद्या व्यक्तिच्या नावावर केलेली छोटी रोपटे काही भागात दिसतात...पहा केवढे उत्तम पुढले प्लॅनिंग आहे शहराचे...


तापमानाची उष्णता अजुनही तापते आहे..गल्ली-बोळ हमरस्ते होऊ पहात आहेत...शिक्षणसंस्थाना आंतरराष्ट्रीय मोल आले...त्यामुळे वाढत्या फिया देऊन परगावचे विद्यार्थी शिकायला म्हणून येतात आणि पुणेकरच बनून जातात... कधी कधी मराठी माणसाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मराठी मुलांना प्राधान्य द्या असे सांगत संचालकांच्या दारी एकवटून जावे लागते...

एकूण काय...वाढलेल्या पुण्याचे पुर्वीचे शांतपण राहिले नाही..ती हवा नाही..तो निवांतपणा उरला नाही....
अधुनिकतच्या रेट्यात एकेक पाऊल पुढे टाकत हे शहर नवे चकचकीत चित्र घेऊन...
नव्या रिती काबीज करीत...
गतीमान होते आहे....



सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276