My Blog List

Saturday, November 14, 2015

आठवणीत राहिलेले भरतचे कट्यार..


भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कट्यार काळजात घुसली या नाटकातील १९७८ सालचे हे प्रकाशचित्र..यात खॉंसाहेब आहेत पं. पद्माकर कुलकर्णी, चॉंद होते..श्रीपाद भावे..तर उस्मान..सुभाष इनामदार
आज कट्यार काळजात घुसली..हा चित्रपट पाहण्याचा योग आहे...म्हणून  १९७८ साली १ जानेवारीला भरत नाट्य मंदिरात काढलेले कट्यार काळजात घुसली या भरत नाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या प्रयोगात काढलेले प्रकाशचित्र स्मरणात आले..जुन्या संग्रहातून ते पहात असताना आठवण झाली..ती त्या प्रयोगाची..मनमोहन जोशी नावाचा आमचा प्रकाशचित्र काढणारा मित्राने त्यावेळी टिपलेल्या त्या भूमिकेतील चित्राची आणि मग भूतकाळात गेलो..

सुमारे ३७ वर्षापूर्वी भरतने त्या कट्यारचे सुमारे ५० चे वर प्रयोग गावोगावी आणि पुण्या-मुंबऊत केले होते..
त्याकाळी संगीत नाट्य स्पर्धेत दरवर्षी भरत नाट्य संशोद मंदिर सहभाग घेत असे...दर्जेदार संगीत नाटके सादर करून आपली संगीत नाटकाची तळपती कलाकृती रसिकांचे लक्ष वेधून घेत होतीच..पण समीक्षक आणि स्पर्धतली टाळ्यांच्या गजरात वन्समोअरची दाद मिळायची..त्या टाल्या आजही कानात घुमताहेत..
शाकुंतल, कट्यार आणि शारदा ह्या तीन नाटकात काम करण्याचे भाग्य मिळाले..खरच त्यासाठी तेव्हाचे भरतचे अध्यक्ष आणि दिग्दर्सक नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे यांची शब्दांवरची पकड आणि विष्णुपंत वष्ट यांचे संगीत मार्गदर्शन  अत्यंत मोलाचे मिळत असे..त्यामुळेच आमचा संच आपले सारे कौशल्या पणाला लावून प्रयोग सादर करायचा..आणि त्याला स्पर्धत तशी दादही मिळायची...

स्पर्धेतून यशस्वीपणे परतल्यावर लागोपाठ भर ते प्रयोग पुण्याच्या रसिकांसाठी सादर करायचा..त्याला प्रतिसादही तसाच अनमोल मिळायचा..

कट्यार साठी फिरता रंगमंचही तयार केलेला..पेंटर राऊळ यांनी केलेला दे्खणा सेटही मागे लक्ष वेधून घ्यायचा.. यात खॉंसाहेब असायचे चिंचवडचे प्रतिभासंपन्न गायक पं. पद्माकर कुलकर्णी.ज्यांनी वसंतरांवांकडे गाण्याचे शिक्षण प्राप्त केले होते..भानुशंकरांचे काम करायचे पं. मुकुंद उपासनी...तर छोटा सदाशिव होता..जयदिप ढमढेरे..तर मोठा सदाशिव होते..सुधीर दातार...झरिना होत्या धनश्री तुळपुळे..तर काही प्रयोगात..विनया मागिकर..उमाची भुमिका करत सुवर्णा ठोंबरे.. कविराज म्हणून झोकात वावरायचे अनंत कुलकर्णी..तर चॉंद-उस्मान असाये..सिधये आणि श्रापाद भावे..काही प्रयोगात मी उस्चीमानची भुमिकाही केली..

संगीत नाटकाला विशेषतः नाट्यसंपदेचे कट्यार तेव्हा बंद होते..म्हणून तर आमच्या प्रयोगाला दाद मिळायची.. दिवाणजी असायचे विनायक गोडसे..

पहिल्या काही प्रयोगात मी बद्रिप्रसाद..म्हणजे मुका.. होतो..माझ्यावर मुख्य जबाबदारी होती प्रॉक्टिंगची..सगळ्यात जास्त विसरत ते पद्माकर कुलकर्णी...
आमच्या रोप्यमहोत्सवी प्रयोगाला आम्हाला खास दिव्याची भेट मिळाली होती..ती ग.दि.मांकडून..तेव्हा ते त्याप्रयोगाचे पाहुणे होते..
असा सुंदर अनुभव मिळाला..नवी ओळख झाली..नवा पट मिळाला...
पुन्हा पुन्हा आठवावा असा अनुभव तुमच्यापर्यत देताना भूतकाळाने दिलेले ते सोनेरी ..मोहमयी..दिवस ..
केवळ आठवण.हिच खरी साठवण होऊन बसते..
हे सारे पुन्हा आठवते ते कट्यारच्या चित्रपटामुळे..त्यांच्या कलाकृतीला माझ्यासारक्या असंख्य संगीत रसिकांच्या लाखलाख शुभेच्छा...



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276