काळाच्या ओघात लपून राहिलेले गायिका राणी वर्मा यांचे पत्र हाती लागले...१९८३ सालचे आणि काय इतिहासकाळ डोळ्यासमोर तरळू लागला..म्हणूनन त्या आठवणीत तुम्हाला शेअर कराव्यात याहेतूने ते पत्र इथे देत आहे.
श्री
२१ सप्टें.८३
श्रीयुत सुभाष,यांस
स.न.वि.वि.
मी सादर केलला अण्णांच्या (कै. विद्याधर गोखले) पुण्यातील कार्यक्रम तुम्हाला मनापासून आवडला हे वाचून खूप बरं वाटलं. कारण खरोखरच या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व कलाकारांनी, एक उत्कृष्ठ प्रतिचा व दर्जेदार असा कार्यक्रम सादर करावा म्हणून अतिशय मनापासून मेहनत घेतली होती व त्याचे सार्थक तुमच्यासारख्या रसिकांकडून आमचे कौतूक ऐकून झालं. कारण मनापासून पाठ थोपटणारे फार कमी भेटतात, पण उलट कितीही चांगलं केलं तरी त्यातून चुका काढणारीच जास्त भेटतात.
एका गोष्टीचं मात्र राहून राहून वाईट वाटलं की, पुणेकरांकडून मी जो प्रतिसाद अपेक्षिला होता, तो मात्र मला मिळाला नाही. म्हणजे पैशांपेक्षासुध्दा हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी ऐकावा, थोडक्यात म्हणजे हा कार्यक्रम House Full जावा ही माझी इच्छा होती, कारण पुण्यात अण्णांचे खूप चाहते आहेत. पण त्यामानाने गर्दि कमी होती. पण आलेले लोकमात्र जाणकार होते हे निश्चित.
तुम्ही `चित्ररंग`( हे साप्ताहिक एके काळी मराठीत इंडियन एक्प्रेस ग्रुपने काढले होते) मध्ये व श्री. अशोक रानडे यांवी `स्वराज्य`मध्ये लिहलेला माझ्या कार्यक्रमाचा review वाचला. अतिशय मनापासून व कळकळीने लिहल्याचे जाणवले. खुपच सुंदर आला आहे.
आपली नम्र,
राणी वर्मा.
अनेक कार्यक्रमाबाबत पुण्यात त्यांची नोंद घेतली जात नाही...मात्र माझ्याकडून मी हा प्रयत्न सातत्याने केला आणि आजही करीत आहे...
मात्र अशी पत्राद्वारे त्याची पावती मात्र मिळाला नाही..ती इथे मिळाली म्हणून हा त्याचे हे उदाहरण..
विद्याधर गोखले
ज्या काळात संगीत
रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे
रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण
ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही
विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे.
४ जानेवारी १९२४ रोजी
अमरावती येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे
मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून
मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती
येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल
एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत
विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले
जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे
पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले.
पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू
लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी
एकूण १८ नाटके लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक
विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील
पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे.
‘संगीत सुवर्णतुला’,
‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’ , ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’,
‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले
जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर
आधारित असलेली संगीत नाटकं. तर ‘बावनखणी’ हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत
नाटक. ‘गझलसम्राट गालिब’, ‘शायरेआजम’, ‘शायरीचा शालिमार’ ही गालिबचे काव
य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी
आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे ‘कविकथा’ हे त्यांचे पुस्तकही गाजले
होते. ‘शंकर सुखकर हो’ हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक
वेगळीच ष्टी देऊन जातो.
गोखले यांची
लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती.
लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना
होता. ‘रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी
स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला.
अशा या
महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन
झाले.